महाराष्ट्रराजकीयसोलापूर
ॲडव्होकेट संतोष न्हावकरांना अरेरावी;संबंधित उमेदवारा विरोधात उच्च न्यायालयात रिपीटेशन दाखल करणार
शहर उत्तर अर्ज छाननीवेळी घडलेला प्रकार

सोलापुर शहर उत्तरच्या उमेदवारी अर्ज छाननीवेळी एकेरी भाषेत अरेरावी केल्याप्रकरणी ॲड संतोष न्हावकर निवडणुक आयोगाकडे करणार तक्रार
सोलापुर:विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवारी अर्जाची छाननी आज बुधवारी झाली शहर उत्तर या विधानसभा मतदार संघात भाजपचे विजयकुमार देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे,स्वराज्य पक्षाचे अमोल शिंदे यांच्यासह इतर अपक्ष उमेदवार उपस्थित होते. यावेळी विजयकुमार देशमुख यांचे वकील ॲड,संतोष न्हावकर यांनी एका उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतली.त्यावेळी संबधित उमेदवाराने वकिलाला एकेरी भाषेत अरेरावी केली त्यामुळे गोंधळ उडाला.यानंतर ॲड संतोष न्हावकर यांनी हा विषय गंभीरपणे घेतला असुन संबधित उमेदवाराच्या विरोधात उच्च न्यायालयात रिपीटिशेन दाखल करणार असल्याचे सांगितले.
Siddha niti news
#Solapur
#North Asembly election