महाराष्ट्रराजकीयसोलापूर

देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच घेतला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे भाजपा सरचिटणीस गणेश चिवटेंनीही घेतला अर्ज

देवेंद्र फडवणीस यांच्या आदेशाने घेतला उमेदवारी अर्ज
भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांचा दावा

मुख्यमंत्र्यांचे ओसडी मंगेश चिवटे यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

करमाळा प्रतिनिधी

भाजपचे गणेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री कार्यालयाचे osd विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनीही करमाळा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे
यामुळे करमळ्याची जागा महायुती मधून भाजपला सुटणार का शिवसेनेला जाणार यावर आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे

करमाळ्याची जागा शिवसेनेची असून यासंदर्भात शिवसेना व भाजपचे प्रमुख पदाधिकारी गेली चार दिवसापासून मुंबई येथे तळ ठोकून आहेत

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यावी ही भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करत आहेत

तर शिवसेना ही जागा भाजपला सोडण्यास तयार नाही

त्यातच आता करमाळ्याचे भूमिपुत्र असलेले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख मिळवलेले मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे

करमाळ्याच्या उमेदवारीवर उद्या दुपारपर्यंत मुंबईत निर्णय होईल अशी सूत्राकडून माहिती मिळत आहे
++++++

बागल गटाला भाजपची उमेदवारी दिली तर भाजपचा कोणताही कार्यकर्ता प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका शहर प्रमुख जगदीश अग्रवाल सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सांगितले आहे
++++++

विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अजित दादा समर्थक असून ही जागा महायुतीच्या धोरणानुसार अजित पवार गटाकडे जात आहे मात्र आमदार संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी न स्वीकारता आज चार अपक्ष उमेदवारीचे अर्ज घेतले आहेत
+++++
******
याबाबत भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता
ते म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची सर्व तयारी करा मी सकारात्मक निर्णय घेतो असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज घेतला असून सर्व कागदपत्रे गोळा करीत आहोत
एबी फॉर्म मिळतात उमेदवारी अर्ज दाखल करू अशी प्रतिक्रिया दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button