सोलापूर

नारीशक्ती ॲप बंद पडल्याने लाडक्या बहिणींचे वांदे

फक्त अंगणवाडी सेविकां कडूनच स्वीकारले जाणार अर्ज

  1. लाडक्या बहिणींनी आता फक्त अंगणवाडी सेविकांकडेच अर्ज करावेत असे प्रशासनाने कळविलेले आहे. नारीशक्ती ॲप द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देखील प्रशासनाने केलेले आहेत.

नारीशक्ती ॲप सध्या बंद पडलेले आहे .त्याच्यावरून केलेल्या अर्ज पुढे सरकत नाहीत अथवा अपडेट होत नाहीत. नारीशक्ती ॲप द्वारे आतापर्यंत भरलेले जेवढे अर्ज होते त्याच्या नंतरचे पुढील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. याचं कारण अनेक अर्ज अपुऱ्या अवस्थेत भरले गेलेले आहेत .अनेक अर्जांना आवश्यक ती कागदपत्रे जोडली गेलेली नाहीत. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी एकाच दंपत्याने 20 ते 30 अर्ज नारीशक्ती ॲप द्वारे दाखल केले होते. आणि विशेष म्हणजे त्यातील काही अर्ज मंजूर देखील झाले होते . आपल्या जिल्ह्यातून 11 ते 11: 25 लाख अर्ज आलेले असताना त्यातील 10 लाख अर्ज मंजूर झाले आहेत. 6 लाख ते 6.5 लाख बहिणींच्या  अकाउंट मध्ये पैसे जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अंगणवाडी सेविकां कडूनच अर्ज करा तेच ग्राह्य धरले जातील नारी ॲप किंवा इतर कुठल्या व्यक्तीकडून अर्ज करूनका व स्वतःची फसगत टाळा असे  अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button