महाराष्ट्र

गणेशोत्सव पालिका आयुक्त पोलिस आयुक्तांचा पाहणी दौरा नुसता फार्स

प्रतिवर्षाप्रमाणे गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ते गणेशोत्सवासाठी लागणारा परवाना असेल किंवा मिरवणूक मार्गावरील खड्डे चुकवत होणारा बाप्पांचं आगमन ते विसर्जन पर्यंत “सोशिक सोलापूरकर” हा उत्सव कसाबसा आनंदाने साजरा करतात शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वात जास्त तक्रारी या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाबाबत करण्यात आली

खड्डे बुजविताना टाकण्यात येणारी हलक्या दर्जाची प्रिमॅक्स,नाहीतर खड्डयात आत्ता पेव्हर ब्लाॅकही टाकण्यात येत आहे पालिका प्रशासनाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसुल कररुपाने मिळतो त्याचा विनियोग मात्र सोलापूरच्या मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल पालिकेचा अपुरा कर्मचारी वर्गामुळे पालिका प्रशासनाचे नियोजन हे फोल ठरत आहे निष्क्रिय लोकप्रतिनिधी त्यांना सामान्य नागरिकांची काय पडलीच नाही

कशात काय मिळेल माझ्या जवळचा कसा मोठा होईल हेच ब्रीद वाक्य सोलापूरातील लोकप्रतिनिधींचं झालेलं आहे.गणेशोत्सव मिरवणूकीवेळी बाहेरगावातील आलेल्या रुग्नांना मिरवणुक मार्गाबद्दल अनेकदा माहिती नसतं त्याबाबतीत वाहतुक पोलिसांनी काळजीपुर्वक विचार करणं गरजेचं आहे असे अनेक प्रश्न सामान्य सोलापूरकर पालिका प्रशासन पोलिस प्रशासनाबाबतीत उपस्थित करताना दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button