काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे शिवसेनेचे धनुष्यबाण घेणार हाती
एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ३१ मे रोजी करणार प्रवेश

काँग्रेसचे माजी गृहराज्य शिवसेनेचे धनुष्य बाण घेणार हाती,…
सिद्धाराम म्हेत्रे 31 मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश…
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेते महायुतीमध्ये येत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचा हात सोडून ते शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेणार आहेत.
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे अक्कलकोट मतदारसंघाचे चार टर्म आमदार राहिले आहेत.एक वेळा ते राज्याचे गृहराज्य मंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते.तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.
शेवटी म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.त्यावेळी महेश साठे, महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती.
#सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटी#अक्कलकोट#सिध्दाराम म्हेत्रे