महाराष्ट्रशासकीय
श्रीशैलमजवळ अपघात अपघातात पोलिस उपायुक्त डाॅ.सुधाकर पठारे यांचे निधन
ज्योतिर्लिंग दर्शन करुन येताना काळाचा घाला

तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. देवदर्शनासाठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे. हे दोघे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी असून पठारे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. आयपीएस सुधाकर पठारे यांच्यावर सध्या मुंबई पोलिसात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.
#dr sudhakar pathare ips#Maharashtra#Mumbai Police#Srisailam