सोलापूर

लेझीम डावात कच्चे….. पण राजकीय डावपेचात तरबेज

आज संपुर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. यात राजकीय मंडळीही कसे मागे राहतील ! आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी अनेक मंडळाच्या गणेश प्रतिष्ठापना मिरवणुकीस उत्स्फूर्त हजेरी लावत कार्यकर्त्यांसमवेत जोषाने लेझीमचे डाव सादर केले. एरव्ही सोलापुरच्या राजकीय डावपेचात तरबेज असलेले हे राजकीय नेते मात्र सोलापुरी लेझीम डावात मात्र सपशेल कच्चेच आहेत हे दिसुन आले.

काही का असेना यंदा मात्र उत्सव मंडळांची चांगलीच चांदी झालेली दिसत आहे . विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेतेमंडळीनी सोलापुरातील अनेक उत्सव मंडळांना भरभरुन वर्गणी दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे. ” आपलंच आपल्याला परत मिळायलंय तर जेवढं जास्त घेता येईल तेवढे वढा बे ” असं मोबाईलवर कार्यकर्त्यांत कुजबुज ऐकायला मिळत आहे. इतकं मात्र खरंय की यंदाचं गणेशोत्सव सोलापुरातील राजकीय मंडळीच गाजविणार हे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button