शासकीयसोलापूर

मध्यवर्ती मंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

दुकाने बंद करण्याची सक्ती नको

सोलापुर -:गणेशोत्सव काळात मंडळांनी साकारलेले आरास व गणेश दर्शनासाठी सोलापूरातील भाविक रात्री घराबाहेर पडत असतात सोलापूरातील बाजारपेठा रात्री दहा वाजता बंद करण्यात येत आहे या वेळेत बदल करुन शेवटचे तीन दिवस वेळ वाढवून द्यावी अशा मागणीचे निवेदन पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांना दिले . सोलापुर शहर मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्यावतीने श्रीशैल बनशेट्टी यांनी परिस्थिती समजावून सांगितली.

यावर सकारात्मक चर्चा होऊन पोलिस आयुक्तांनी यावर समाधानकारक तोडगा काढणार असल्याची माहिती ट्रस्टी श्रीशैल बनशेट्टी यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर दिली यावेळी उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर,ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे,सोमनाथ मेंडके,उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम,अभिषेक रंपुरे,अमर कुलकर्णी,शिवानंद येरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button