सोलापूर
ब्रेकिंग:हिप्परगा ब्रीजवर भीषण अपघात;अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

सोलापूर तुळजापूर रोडवरील हिप्परगा ब्रीजवर एसटीखाली येऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली आहे
अक्कलकोटवरुन तुळजापूरकडे जाणारी एसटी बस क्रमांक एम एच 14 बी एल 1207 च्या चाकाखाली मोटरसायकल क्रमांक एम एच 13 बी एस 3501 वरील दुचाकीस्वार एसटीच्या खाली आल्याने 100 फुटावर मृतदेह फरफटत गेल्याचे दिसुन आले
घटना समजताच जोडभावी पेठ पोलीस दाखल झाले असून बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने एकीकडचा रस्ता बंद करण्यात आला असुन हा अपघात स्काॅर्पियो कारने कट मारल्याने झाल्याचे बोलले जात आहे मृताची ओळख पटली नसुन ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले