सोलापूर

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ कार्यालय उद्घाटन व अहवाल प्रकाशन

*सोलापूर – स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेल्या सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन व वार्षिक अहवालाचे प्रकाशन शिवानुभव मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी श्री कामेश्वर अतिथी गणपतीचे पुजन करुन आरती करण्यात आली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टी माजी अध्यक्ष सुनील रसाळे यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शोभाताई श्रीशैल बनशेट्टी,दिलीपराव धोत्रे,जैनोद्दीन शेख,प्रशांत इंगळे उपस्थित होते त्याचां सत्कार ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे व उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी केले याप्रसंगी माजी ट्रस्टी अध्यक्ष दास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले

तसेच सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचा इतिहास, श्री आजोबा गणपती यांची प्रेरणा घेऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सोलापुरात आल्यानंतर हा गणेशोत्सव सार्वजनिक रुपात महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी बोलताना माजी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाले की सोलापुरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी व तक्रारी यांचे निवारण करण्यासाठी सर्व मंडळांचे एक महामंडळ करावे असे संकल्पना मांडण्यात आली

आणि कै.विश्वनाथ बनशेट्टी आप्पा कै. वि रा पाटील आदींनी सोलापुरातील सर्व मंडळातील प्रमुख नेते लोकांना एकत्र करून हे मंडळ स्थापन केले तीच परंपरा रसाळे, शेळके, श्रीशैल बनशेट्टी,संजय शिंदे ,बसवराज येरटे हे सर्व राबवत आहेत हे पाहून आनंद वाटतो. मध्यवर्ती संस्थापक माजी महापौर वि.सि.बनशेट्टी, माजी आमदार धर्मवीर वि.रा.पाटील , सिद्रामप्पा फुलारी,मंजनराव पुकाळे,प.रे.कोसंदर,ह.ई.राचेटी,आण्णा सांळुके यांच्यासह कार्यवृतांतचा अहवाल पुस्तक रुपी छापुन याची महाराष्ट्रभर प्रसार करण्याचे मनोगत दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले सदर प्रसंगी सर्व आजी माजी ट्रस्टी उत्सव समितीचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते*

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button