क्राईम

शस्त्र घेऊन सोलापूरात दहशत माजविणार्‍यां दोघांना दोन जिल्ह्यातुन तडीपार

सोलापूर पोलीस आयुक्तालयानं ऊजेर परवेश दफेदार आणि सलमान गुडुभाई पटेल या दोघांना सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार केलंय. तडीपारी आदेशानंतर या दोघांना शेजारच्या कर्नाटक राज्यात सोडण्यात आलंय.

ऊजेर परवेश दफेदार (वय-२६ वर्षे, रा. ५५, शोभादेवी नगर, मजरेवाडी, सोलापूर) याचेविरुध्द साथीदारासह घातकशस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करुन दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे तर सलमान गुड्डुभाई पटेल (वय-२८ वर्षे, रा. ४२, विष्णु नगर भाग-०२, मजरेवाडी, सोलापूर) याचेविरुध्द साथीदारासह घातक शस्त्र जवळ बाळगून नागरीकांना मारहाण करुन दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलंय.Tag M.Rajkumar CP, Solapur Crime

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button