महाराष्ट्रराजकीयसोलापूर

माजी महापौर महेश कोठेंचं पार्थिव तीन वाजता पोहोचणार

खराब हवामानामुळे विमानाच्या टेक ऑफसाठी झाला उशीर

माजी महापौर महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव घेऊन एअर ॲम्बुलन्स लखनऊ विमानतळावरून दुपारी एक वाजता टेकऑफ केलेले आहे. साधारण तीन वाजता सोलापूर विमानतळावर एअर ॲम्बुलन्स पोहचेल. त्यानंतर जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर मुरारजी पेठ येथील ‘राधाश्री’ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. संध्याकाळी साडेपाच वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button