महाराष्ट्र

बसवेश्वर विचार मंचचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*शिक्षकेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळांचाही होणार सन्मान*.


सोलापूर, दि. (———-)-येथील बसवेश्वर विचार मंचच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारे आदर्श शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी जाहीर केले.
पुरस्कार वितरण समारंभाचे यंदाचे हे तिसावे वर्ष असून यंदा 12 शिक्षक, सात शिक्षकेतर कर्मचारी व चार उपक्रमशील शाळांची निवड करण्यात आली आहे.
*आदर्श शिक्षक*-सौ.गीताभारती रामपुरे -एस.व्ही.सी.एस.प्रशाला भवानी पेठ,शंकर नाना आवताडे- मुख्याध्यापक ,जवाहरलाल शेतकरी हायस्कूल मंगळवेढा,वसंत पवार जागृती विद्या मंदिर,बाळासाहेब शिंगाडे -विवेक वर्धनी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय पंढरपूर ,सुहास छंचुरे -श्राविका प्रशाला , सौ.नीता येरमाळकर – मुख्याध्यापिका-स.हि.ने.प्रशाला ,सौ. चित्रा रंपुरे-धाराशिवकर -डॉ. आंबेडकर मेमो.नाईट हायस्कूल,सौ.वैशाली कदम -दयानंद मॉडेल स्कूल,मारुती माने- मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे वस्ती, रमेश यादवाड- मुख्याध्यापक श्री.न. फु.शहा कोठारी हायस्कूल, सौ.उषा क्षीरसागर- श्री.बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल, खालीद अब्दुलरजाक- न्यू कस्तुरबा उर्दू प्रायमरी स्कूल
*शिक्षकेतर कर्मचारी*-प्रकाश आळंगे -श्री. सहस्त्रार्जुन प्रशाला, चंद्रकांत नवत्रे -व्हीव्हीपी तंत्रनिकेतन, दत्ता भोसले -छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज,वाल्मिकी उर्फ सचिन झुंजारराव-दयानंद महाविद्यालय, संतोष हिरोळे-मातोश्री सरस्वती चाकोते प्रशाला, डॉ.अभिजीत जगताप- आरोग्य अधिकारी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर, आप्पासाहेब चव्हाण -दयानंद काशिनाथ आसावा प्रशाला
*उपक्रमशील शाळा*-सहस्त्रार्जून शिक्षण संकुल,पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला,छत्रपती शिवाजी प्रशाला,आयडियल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा
हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.बलिदान चौक येथील जैन स्थानकात होणार आहे. प्रवचन प्रभाविका साध्वी प्राचीश्रीजी यांच्या मंगल सानिध्यात,आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली, आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार, जैन स्थानकवासी संघाचे पदाधिकारी पदम राका,जितू बलदोटा,राजा गांधी,गौतम संचेती आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button