धर्मराज काडादी यांच्या विजयाचा घरोघरी संकल्प
शहरी भागातही मिळतोय काडादींना भरघोस प्रतिसाद

धर्मराज काडादी यांच्या
विजयाचा घरोघरी संकंल्प
विजापूर रोड परिसरातील पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांन निवडून देण्याचा संकल्प विजापूर रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला.
मंगळवारी, सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा होता. काडादी हे सर्व समाशेक व्यक्तिमत्वाचे असून सर्वांना सोबत घेऊन जाणार आहेत. विकासाची दृष्टी असलेल्या काडादी यांच्या विजयाचा निर्धार मतदारांनी बोलून दाखविला.
मतदार मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले तर सुवासिनींनी औक्षण करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पदेखील यावेळी करण्यात आला.
सकाळी साडे आठ वाजता जुना विजापूर नाका येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल-ताशाच्या निनादात ही भव्य-दिव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून निवडून येणार कोण, काडादी साहेबांशिवाय येणार कोण, हवा कुणाची, काडादी साहेबांची, काडादीसाहेब तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या. धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते.
कार्यकर्त्यांनी अनेक नगरांतील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचे माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
जुना विजापूर नाका येथून सुरु झालेली पदयात्रा गरिबी हटाओ एक नंबर झोपडपट्टी,गौतम नगर मार्गे मार्गस्थ झाली. उत्कर्ष नगर, इंदिरा नगर, रामलिंग नगर, रामलिंग नगर सहकारी हौसिंग सोसायटी, निर्मिती बहार, एसटी कॉलनी, विष्णु प्रिया अपार्टमेंट मार्गे साई रेसिडेन्सी येथे पोहोचली. या मार्गावर अनेक ठिकाणी माता भगिनींनी औक्षण करून काडादी यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. त्यानंतर ही पदयात्रा सालेश्वर सोसायटी, शिवाजी हौसिंग सोसायटी,रेल्वे सोसायटी, आदीत्य नगर, साई होम्स कॉलनी, निर्माण गॅलेक्सी, जाई जुई नगर,साई यशोदा हाईटस, चौडेश्वरी मंदिर, वृंदावन सोसायटी, सिध्दरामेश्वर सोसायटी, भाग्यश्री नगर, सिटीझन पार्क, नालंदा बुध्द विहाराला वळसा घालून नालंदा नगर येथे आली. या मार्गावर सोलापूर दक्षिणच्या सर्वंकष विकासाची आस असलेल्या अनेक परिवारांनी काडादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. सुहासिनींनी औक्षण करून आशिर्वाद दिले.
नंतर काडादी यांची पदयात्रा नवीन आरटीओ परिवर, गणेश नगर, निशिगंधा अपार्टमेंट, स्मृतीगंधा अपार्टमेंट, राजस्व नगरात आली. येथील सच्चिदानंद श्री गजानन सत्संंग भवन येथे काडादी यांनी श्रींचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. नंतर सिध्देश्वर वनविहारच्या समोरील परिसर, निर्मिती गणेश सोसायटी, सदिच्छा सोसायटी, बंजारा सोसायटी, साईश नगर, विद्या नगर, साईधन नगर, शाहू नगर, सदिच्छा नगर, सोनामाता नगर, महात्मा बसवेश्वर ब्लड बँक, बुरूडकर टॉवर, राजर्षी शाहू नगर, ब्रम्ह चैतन्य नगर, आंबेडकर चौक, बेनूर नगर, सुंदरम नगर, तुळजाभवानी मंदिर, अमृत नगर, माशाळे वस्ती, अशोक नगर मार्गे विजारोड येथे आयडीबीआय चौकात समाप्त झाली.
या पदयात्रेत श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील-कुडल, विद्यासागर मुलगे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष डॉ. भारत जाधव, ज्येष्ठ नेते सदाशिव बनसोडे, प्रा. विलास मोरे,माजी चेअरमन रामलिंग शिंदे, प्रा. लहू गायकवाडयांच्यासह सिध्देश्वर परिवरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोलापूर दक्षिण मतदार संघातील सर्वपक्षीय कार्यकर्तेही या पदयात्रेत सहभागी झाले होते.
—————
‘कॉम्प्युटर’ चिन्ह अन् 16 व्या क्रमाकांचे बटण
आधुनिक युगात कॉम्प्युटरशिवाय कोणतेही काम शक्य नाही. या कॉम्प्युटरचे महत्त्व आता सर्वांनाच पटले आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचे निवडणूक चिन्ह कॉम्प्युटरच आहे. पहिल्या मतदान मशिनवर सर्वात खाली 16व्या क्रमांकावर कॉम्प्युटर चिन्ह आहे. या कॉम्प्युटरचे बटण दाबून काडादी यांना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी मतदारांना घरोघरी भेटून केले.
–चौकट—-
मतदारांना सक्षम पर्याय हवा आहे-काडादी
पदयात्रेच्या सांगता प्रसंगी विविध माध्यमांशी बोलतांना काडादी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पदयात्रेखा वृत्तांत सांगितला. देश, राज्य आणि महापालिकेतही त्यांच्याच हाती कारभार होता. मात्र, सूड आणि कुरघोडीच्या राजकारणाशिवाय सत्ताधार्यांनी काहीच केले नसल्याने कंटाळलेल्या जनतेला सक्षम पर्याय हवा आहे. पदयात्रेस मिळत असलेला दणदणीत प्रतिसाद त्याचाच पुरावा आहे.ही निवडणूकी जनतेनेच स्वतच्या हाती घेतली असून आपण केवळ निमित्त असल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितले.