क्राईममहाराष्ट्रराजकीयसोलापूर

सोलापुर शिवसेना शिंदे गटाचे निवेदन

बेपत्ता मुलींचा तात्काळ शोध घ्या अन्यथा मुंडन आंदोलन करणार योगेश सलगर

सोलापुर: दि,४ अंबादस सिद्राम कडगुड्ड, रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर यांची मुलगी दि. १९ एप्रिल २०२५ रोजी राहत्या घरातून आईसोबत झालेल्या किरकोळ वादातून घरातून निघून गेली आहे. तरी तिच्याबद्दल जवळच्या व परगावी असलेल्या नातेवाईकांना समक्ष भेटून व फोनच्या माध्यमातून संपर्क केले असता ति त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले. ही बाब मुलीच्या वडिलांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे येथे २१ एप्रिल २०२५ रोजी बेपत्ता दाखल केले आहे. जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून घडलेल्या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यांनी ह्या सर्व प्रकरणाची जबाबदारी पोलीस कॉनस्टेब्ल सुरेश जमादार यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगितले. तदनंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी वापरत असलेल्या मोबाईल नंबर पोलीस कॉनस्टेब्ल सुरेश जमादार यांना दिले. त्यांनी २ दिवसात कॉल डिटेल्स काढून आम्ही तुमच्या मुलीला शोधून काढू असे आश्वासन दिले. त्यापस्च्यात्य मुलिचे वडील वेळोवेळी चौकीत जाऊन देखिल पोलिस प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे व ११ दिवस उलटून देखील कोणतेही न्याय न मिळाल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून कडगुड्ड कुटुंबाने शिवसेना शिंदेगटाच्या भवानी पेठ विभागप्रमुख योगेश पिरचंद सलगर यांच्या माध्यमातून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा रविवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी बोलताना दिला, याप्रसंगी पिडीत कुटुंबाचे परिवार, आयुष बेलेरू, संदीप हबीब, महादेव स्वामी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button