महाराष्ट्रराजकीयसोलापूर

शहर मध्यसाठी देवेंद्र कोठे……भाजपाकडुन अखेर ठरलं?

देवेंद्र कोठे शहर मध्य भाजपा.......

शहर मध्य सुटले भाजपला देवेंद्रचा होणार उदय ; तर काँग्रेस कडून बाबांना पुन्हा संधी ; शाब्दी देखील ठोकणार शड्डू

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज,
सोलापूर, दी. २१ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. कालच भारतीय जनता पार्टी वरिष्ठ कार्यालयाकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये शहरातील शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख, शहर दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुख, तसेच अक्कलकोट मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी याच विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर करत त्याच आमदारांवर विश्वास टाकला आहे. येत्या दोन दिवसात उर्वरित मतदार संघातील उमेदवारांची देखील नावे जाहीर केली जाणार आहेत.

दरम्यान येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या यादीमध्ये मोठा फेरबदल झालेला दिसत आहे. महायुतीमध्ये शिवसेनेकडून शहर मध्य विधानसभा मतदार जागा काबीज करण्यात भाजपला यश आले आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघ जागेवर देवेंद्र कोठे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील बाबांना पुन्हा एकदा संधी देण्याचा मानस काँग्रेस हाय कमांडने ठरवला आहे. एम आय एम कडून फारूक शाब्दि यांचे नाव यापूर्वीच निश्चित केले आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पहावयास मिळेल. मात्र येत्या दोन दिवसांमध्ये खरे चित्र कळणार आहे.

मुस्लिम आणि दलित बहुमूकल इलाक्यात फारुक शाब्दि आणि बाबा मिस्त्री यांची टक्कर दिसून येईल. तर सर्वसामान्यपणे देवेंद्र कोठे यांना भाजप मांडेट मतदार तारणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल असा अंदाज राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button