महाराष्ट्र

लिंगायत समाजाच्या ‘या’ प्रश्नावर आंदोलने, निवेदने देऊन बस्स झाले… येणा-या निवडणुकीत समाजाचा राग दिसणार

सोलापूर शहरात लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय असुन समाजाला मिळाव्या त्या सोयी सुविधा शासनाकडुन मिळत नाहीत त्यासाठी निवेदने,आंदोलन करुन त्या मिळवाव्या लागतात ही खेदाची बाब आहे.
सोलापुर जिल्ह्यातील दोन मतदार संघावर प्रभाव टाकणारा मतदार या समाजात आहे. दोन लोकप्रतिनिधी ठरविण्याची ताकद या समाजात आहे पण समाजात अंतर्गत कुरघोडीचं राजकारण असल्याने समाजात एकवाक्यता नसल्याचे अनेकवेळा दिसुन आलेले आहे.

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ लिंगायत समाजातील अनेक युवकांना शासकीय निकषात न बसल्याने मिळत नसल्याची तक्रार समाजातील युवक करताना दिसत आहेत.
हद्दवाढ असलेल्या सोलापूर शहरात लिंगायत समाजासाठी असलेली रुद्रभुमी (स्मशानभूमी ) दोनच असुन त्यांचे क्षेत्र हे कमी असल्याने दुरवरुन पार्थिव शरीर हे श्री.सिद्धेश्वर देवस्थान रुद्रभुमीत आणले जातात व अंत्यविधी उरकले जातात.

सोलापुर गावठान भागातील शेळगी,दहिटणे,मुळेगांव शहरहद्द,बाळे,जुळे सोलापूर,विजापुर रोड या भागातील समाजबांधवांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत शासनाने या संवेदनशील विषयावर त्वरीत तोडगा काढुन सर्वसोयीनेयुक्त असे तीन रुद्रभुमी ( स्मशानभूमी ) साठी सोलापुरात जागा द्यावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत समाजाचा राग मतपेटीद्वारे दिसुन येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बनशेट्टी यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button