महाराष्ट्रसोलापूर

नऊ लाख लाडक्या बहिणींचे अन्नपूर्णा अनुदान अपात्रतेच्या घेऱ्यात

3 सिलेंडर मिळणार नाहीत

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपयांचे अनुदान आहे ते उज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणारे 3 मोफत सिलेंडर अनुदान जर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या म्हणजेच लाभार्थी महिलेच्या नावे कनेक्शन असेल तरच दिले जाणार आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जाहीर केले. परंतु अनेक महिलानी गॅस सिलेंडर स्वतःच्या नावे न ठेवता किंवा घेतानाच त्यांच्या पतीच्या अथवा कुटुंबातील पुरुषाच्या नावे गॅस सिलेंडर घेतल्याने या योजनेचा लाभ मिळविण्या मध्ये अडचणी येत आहेत. महिलांच्या नावे गॅस असल्यास राज्य शासनाकडून 530 व केंद्र शासनाकडून रुपये 300 रुपये असे एकूण 830 रुपयांचे अनुदान कनेक्शन धारक बहीणीला मिळणार आहे. या योजनेची प्रमुख अट म्हणजेच महिलेच्या नावे असणारे गॅस कनेक्शन असणे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपयांचे जे अनुदान आहे ते गॅस सिलेंडर चे कनेक्शन मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीच्या नावे असल्यावरच मिळणार आहे. या एकाच कारणामुळे साधारणतः 9 ते 9.50 लाख बहिणी या अनुदानापासून वंचित राहतील अशी माहिती मिळत आहे. यावरती मात करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री संतोष सरडे यांनी महिलांनी गॅस कनेक्शनच्या नावात बदल करून, केवायसी दाखल करून , त्याची कागदपत्रे सबमिट केल्यास गॅस सिलेंडरचे अनुदान व लाडकी बहिणीचे अनुदान मिळण्यास सोपे जाणार आहे असे सांगितले. वर्षभरातून तीन सिलेंडर महिलांना मोफत मिळण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. परंतु सरकारी काम आणि सरकारी लाभ मिळण्यासाठी अनेक कागदपत्रांची तजवीज करावी लागते. बरेचदा लाभार्थी सदर योजनांसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती न घेता किंवा अर्धवट माहितीच्या आधारे अर्ज दाखल करतात आणि ऐन वेळेला सदरच्या योजनेमध्ये अपात्र होतात आणि त्यानंतर त्या योजनेची वेळ निघून गेलेली असते सदर योजना मिळवण्यासाठी महिलांना अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने वारंवार यात बदल केलेला आहे अनेक त्रुटी व चुकांची दुरुस्ती केलेली आहे यामुळे सदरची योजना ही यशस्वी होण्याकडे वाटचाल करत आहे या कागदांच्यामुळे होणारे अपात्रतेवर सरकारने पुन्हा एकदा गॅस कनेक्शन घेतलेल्या कंपन्यांमध्ये जाऊन नावात बदल करून केवायसी दाखल करून त्याची कागदपत्रे जमा करण्यासाठी मुभा व संधी दिलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button